अभिनय आणि प्रशिक्षण

सध्या अभिनयक्षेत्रात दोन प्रकारचे अभिनेते आहेत.
प्रशिक्षण घेतलेले आणि न घेतलेले.
- प्रशिक्षण घेतलेले लोक या क्षेत्रात यायचे हे ठरवून आलेले असतात. त्यामुळे पध्दतशीर अभ्यासक्रम करतात. 
- प्रशिक्षण न घेतलेले लोक हौशी एकांकिका स्पर्धांतून पुढे आलेले असतात. हौस म्हणून काम करता करता एका टप्प्यावर अभिनयक्षेत्रात यायचे हे ठरते. तोपर्यंत खूप स्पर्धा झाल्यामुळे अनुभव आलेला असतो. अभ्यासक्रम केला जातोच, असे नाही. 

दोन्ही प्रकारचे लोक यशस्वी झाल्याचे दिसते.

हल्ली, अभिनयक्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे ?
(इथे चिकाटी, कष्ट आदी गुण आवश्यक आहेतच हे गृहित धरले आहे. केवळ प्रशिक्षणावर मतप्रदर्शन व्हावे.)