वारंवार तुला काय समजवे

वारंवार तुला काय समजवे

तीः वारंवार तुला काय समजवे नूपुरांची झंकार ।
तो: काय?
तीः तुजविण सजणा रमते न मन जीवनात ॥ धृ ॥

तोः लपत छपत करतो काय इशारे चंद्र हा शंभर वार ।
ती: काय?
तोः ये चल सजणे नेऊ तुज नदीच्या पल्याड ॥ धृ ॥

तीः चालतांना का थांबलास माझ्या साजणा ।
भेटतांना का झुकले गं प्रिये तुझे नयन ।
झुकलेले डोळे करती बघ जाहीर तव होकार ॥
तो: काय?
तीः तुजविण सजणा रमते न मन जीवनात ।
तोः ये चल सजणे नेऊ तुज नदीच्या पल्याड ॥ १ ॥

तोः दरियावरती चांदणे ये हळू हळू ।
लाटांवरती मन माझे बघे झुलू झुलू ।
एकच गोष्ट सांगतो तुला मी म्हणू नको तू ना ॥
ती: काय?
तोः ये चल सजणे नेऊ तुज नदीच्या पल्याड ।
तीः
तुजविण सजणा रमते न मन जीवनात ॥ २ ॥

तीः सरो न आता रात ही संगे गुज करू ।
नुसते ताऱ्यांच्या सावलीत चालतच फिरू ।
नाव तुझे घे घेऊन गाई स्पंदनांची हर तार ॥
तोः  काय?
ती: तुजविण सजणा रमते न मन जीवनात ।
तोः ये चल सजणे नेऊ तुज नदीच्या पल्याड ॥ ३ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१०

ओळखा तर मूळ हिंदी गीत. या वेळेला फारच सोपे आहे.