अंबरातुनी प्रेषित आला

अंबरातुनी प्रेषित आला पाठ प्रीतिचा शिकवाया
हृदयि प्रियेचे चित्र असे, ते घेउन आलो दावाया ।ध्रु।

शिकुनी - तू घे ना - ही रीत प्रीतिची मजकडुनी
मजवर - प्रेमाचा - तू निश्चय - आज कर मनी ।१।
अंबरातुनी प्रेषित आला ...

राणी, - तुजसाठी - मी चंद्रलोक सोडुन आलो
माझी - ही प्रीती - सप्रेम भेट घेउन आलो ।२।
अंबरातुनी प्रेषित आला ...

छायाच तुझी मी - तुझिया सवेसवे येइन मी
मरतो - तुजवरती - बांधून तुज सवे नेइन मी ।३।
अंबरातुनी प्रेषित आला ...

पाठभेदः

१. अंबरातुनी प्रेषित आला प्रेमाची शिकवण द्याया

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )