सावधान! ही आयडिया तुम्हाला शेकडो रुपयांना फसवू शकते....

माझेकडे आयडीया चा प्रिपेड मोबाईल आहे. त्याची रेंज, आवाज आणि आवाजातील सुस्पष्टपणा बद्दल मला नेहेमी चांगलेच अनुभव आले आहेत.

पण काल (२८/०८/२००८) माझ्या सोबत जे काही घडले ते संतापजनक आहे. आणि मला असे वाटायला लागले की ही आयडिया तुम्हाला शेकडो रुपयांना फसवू शकते.

माझेकडे शंभर रुपयांवर शिल्लक होती.  मी मराठी डायलर टोन लावण्यासाठी ५५४५६१६ वर डायल केले.   मला माहिती होते की त्यासाठी मिनिटाला ६. ९९ रुपये लागतात.   सोयीसाठी आपण ७ रुपये म्हणूया.   मी चारच मिनिटांच्या आत एक गाणे निवडले.   एक आवाज म्हणाला: " तुमची डायलर टोनसाठीची विनंती आमच्याकडे पोहोचली आहे. हे गाणे तुमचा डायलर टोन म्हणून लावण्यात येईल पण त्यासाठी तुमच्या खात्यात हा कॉल संपल्यानंतर कमीत कमी ३० रुपये असले पाहिजेत, जे महीन्याचे भाडे म्हणून कापण्यात येईल. "  मी खुष झालो.   कॉल बंद केला. पाहातो तो काय?   या कॉलचे ८४ रुपये कापण्यात आले होते.   आणि  शिल्लक होते फक्त ३. ६७ रुपये.   कसे काय?   चार मिनिटाला सात चोक अठठाविस एवढेच रुपये कापले जायला हवे होते. समजा गाणे निवडण्याचे १५ रुपये त्यात मिळवले तरी त्रेचाळिस रुपयेच होतात.   मग ८४ रुपये कसे काय कापले गेले? मग आपले निवडलेले गाणे वाया जावू नये म्हणून मी लगेच ३०० रुपयांचे टॉप अप केले. पण, पुन्हा एक धक्का बसला. ते टॉप अप अजून पर्यंत झालेले नाही, जे ईतर वेळेस दोन सेकंदात होते. चोवीस तास उलटले तरी ते टॉप अप अजूनही झालेले नाही. आणि मला कालच एक एस. एम. एस. आला की, " अपूर्ण शिल्लक असल्याने तुमचा डायलर टोन सेट होवू शकला नाही. पुन्हा डायल करून पुन्हा गाणे निवडा. "

आपणही मराठी डायलर टोन सेट करू इच्छीत असाल तर सावधान. असा अनुभव तुम्हालाही येवू शकतो आणि तुम्ही फसवले जावू शकता.

आता याला कुणाला दोष देणार? आपल्यालाही असे काही (मोबाईल संदर्भात) अनुभव आले असतील तर येथे सांगा.   इतर लोक तरी फसवाफसवी पासून वाचतील.

---- निमिष सोनार, पुणे