ए स्वामी तुझे दास आम्ही

ए स्वामी तुझे दास आम्ही

ए स्वामी तुझे दास आम्ही ।
करणी आमची असावी अशी ॥
नेकीने चलू ।
आणि बदीला त्यजू ।
ज्याने हसतच जाईल प्राणही ॥ धृ ॥

आहे असमर्थ मानव किती ।
ह्यात लाखो उणीवा तरी ॥ 
पण तू जो उभा ।
आहेस दयाळू सखा ।
तुझ्या कृपेवरती स्थिर ही जमीन ॥
जन्म तू आहेस आम्हाला दिला ।
आमची दुःखेही हरशील आता ॥ १ ॥

अंधार हा गडद होत आहे ।
तुझा माणुस घाबरतो आहे ॥
होत तो बेखबर ।
न काही येते नजर ।
सौख्यसूर्यही लपू लागला ॥
आहे दीप्तीमध्ये तव जो दम ।
अमावस्येला करी तो पुनम ॥ २ ॥

जेव्हा जुलुमांचा हो सामना ।
तेव्हा तू हात धर आमचा ॥
ते करोत वाईटही ।
जे भले तेच करू ।
न हो सूडाची कधी कामना ॥
पाऊल प्रेमाचे हर, हो पुढे ।
आणि वैराचे भ्रम संपू दे ॥ ३ ॥

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०९०६

औंधच्या राजाची गोष्ट, शांतारामांनी अतिशय चांगली सादर केलेली आहे या चित्रपटात.
ओळखा तर हे प्रेरणादायक मूळ हिंदी गीत.