तेलतिखटमीठपोहे

  • पातळ पोहे २ मुठी चाळून निवडून घ्या.
  • अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे
  • मूठभर बारीक चिरलेला कांदा
  • अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट
  • चवीपुरते मीठ
  • ५-६ चमचे कच्चे तेल
  • पाव चमच्याहून कमी साखर
५ मिनिटे
१ जण

वरील सर्व जिन्नस एकत्रित करून कालवा. चमचमीत पोहे तय्यार!!!

लहानपणी आम्ही दोघी बहिणी मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे रहायला जायचो. सकाळी मामी भाजी आणायला बाहेर जायची तेव्हा आम्ही सर्व भावंडे मिळून हे पोहे खायचो. मोठी परात भरून पोहे करायचो. एकदा मामी बाहेरून लवकर आली आणि आम्हाला खूप ओरडली. काय हे कच्चे पोहे खाताय , अशाने पोटात दुखेल तुमच्या. अशीच एकदा मामी बाहेरून लवकर आली तर मामेभावाने पोह्यांची परात गॅस खाली लपवली. मामीने सर्व स्वयंपाक केला तरी तिचे लक्ष गॅसखाली दडपलेल्या पोह्यांकडे गेले नाही.   असो.

लेखी अभ्यास करताना हे पोहे खावेत. एकाग्रता वाढते.

पीसी वर टीपी करताना खावेत.

सगळ्याचाच खूप कंटाळा आला असेल तर खा, उत्साह येईल.

बैठे खेळ खेळताना (पत्ते, कॅरम) खावेत.

मामेभाऊ सुहास, सुबोध, सुनील