मक्याचे कटलेट

  • ५ मध्यम आकाराचे बटाटे
  • १ वाटी मक्याचे दाणे-अमेरिकन पिवळे मके असतील तर उत्तमच
  • ३ ते ४ हिरव्या मिरच्या
  • साधारण २ पेराएवढा आल्याचा तुकडा
  • ४ ते ५ लसूण पाकळ्या
  • ४ ते ५ ब्रेड स्लाईस
  • ४ ते ५ चमचे रवा
  • मीठ
  • तेल
१ तास
साधारण २० कटलेटस होतात.

बटाटे उकडून घ्या. मके जर कॅन्ड नसतील तर तेही बटाट्यांबरोबर उकडा. कॅन्ड मके उकडण्याची गरज नाही. चाळणीवर टाकून मक्यातले पाणी काढून टाका. कॅन्ड मके असतील तरी चाळणीवर टाकून नळाखाली धरा म्हणजे प्रिझर्वेटिवचा वास जाईल. बटाटेही चाळणीवर टाकून कोरडे होऊ द्या. साले काढून कुस्करा. वाटीने किवा पावभाजीच्या चेपणीने चेपून घ्या. नसल्यास किसून घ्या.
पावाचे स्लाइस पाण्यातून काढा व पिळून घ्या. हा गोळा किसलेल्या बटाट्यांत मिसळा.
आले, लसूण, मिरची वाटून त्याची पेस्ट करा व ही पेस्ट वरील गोळ्यात मिसळा. मीठ चवीनुसार घाला. हे मिश्रण मळून सगळीकडे तिखट मीठ लागेल असे पाहा.
एका ताटलीत रवा घ्या. गोल, लांबट हव्या त्या आकाराचे कटलेट वळा व हे कटलेट रव्यात घोळवा आणि पॅनमध्ये मध्यम आचेवर शॅलोफ्राय करा.
गरम गरम कटलेट टोमॅटो सॉस किवा स्प्रिंगरोलबरोबरच्या आंबटगोड चिली सॉस बरोबर खा किवा जोडीला भेळेची चिंचगूळ खजुराची चटणी असेल तर क्या केहेने!!
टीप- १. ह्या साहित्यात साधारण २० कटलेटस होतात.
२. मक्यांऐवजी किवा मके+ मटार घालूनही हे कटलेटस छान लागतात. मके आणि मटार घ्यायचे असतील तर दोन्ही प्रकार अर्धी अर्धी वाटी घ्या.

१. ह्या साहित्यात साधारण २० कटलेटस होतात.
२. कॉर्नऐवजी किवा कॉर्न+ मटार घालूनही हे कटलेटस छान लागतात. कॉर्न आणि मटार घ्यायचे असतील तर दोन्ही प्रकार अर्धी अर्धी वाटी घ्या.

स्वतः