हिमेश रेशमिया?

हिमेश रेशमियाला परग्रहवासी घेऊन जाणार अशी एक "फुटकी (फुटकळ खरंतर) बातमी" इंडिया टी. व्ही. ने नुकतीच प्रसिद्ध केली. दुवा क्र. १ या दुव्यावर ही बातमी आपल्याला पाहता येईल.

मागे एकदा असेच हिमेशच्या गाण्याने भूत-पिशाच्च जागृत होतात वगैरे बातम्या आल्या होत्या.

इतके अ-मानुष संगीत निर्माण करणाऱ्या या व्यक्तित्वाचा परिचय वाढावा अशी इच्छा आहे......

इथे त्याच्या रंजक आणि उद्बोधक आठवणी काढून, सुरस आणि चमत्कारिक कथा सांगून-ऐकून  मनमुराद हसावं, झालंच तर थोडं प्रसारमाध्यमांच्याविषयी बोलावं, गेलाबाजार हिमेशच्या "संगीताविषयी" चर्चा तरी करावी असं वाटलं.

पण तरी, हिमेश रेशमिया........?