वस्तुविनिमय शक्यता

खूप पूर्वी वस्तुविनिमयाची पध्दत भारतात अस्तित्वात होती. 

गेली अनेक वर्षे वस्तूंची खरेदी पैसे देऊन होत आहे. 
पैसे हे चलन बनलेले आहे. ते संपत्ती गोळा करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरले जाते. पर्यायाने पैसा हे जगण्याचे    साधन बनलेले आहे. ज्याच्याकडे पुरेसा पैसा आहे, तो मृत्यूपर्यंत तग धरू शकतो.
महागाई वाढत आहे आणि ती वाढत राहणारच. महागाई ही संकल्पनाही पैशामुळेच निर्माण झाली आहे. एखाद्या वस्तूची पैंशांमध्ये किंमत वाढली की ती वस्तू महाग झाली आहे, असे म्हटले जाते. देवाणघेवाण करणाऱ्या माध्यमाला असलेल्या महत्वामुळे महागाईचा त्रास होतो. 
विचार असा -
एखादी वस्तू पैसे देऊनच घेतली पाहिजे, असे नाही. ती वस्तू आपल्याकडे येणे महत्वाचे असते.
दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या बदल्यात ती घेणे शक्य आहे.
म्हणजेच, वस्तुविनिमय करूनही संपत्ती गोळा करणे व कमी करणे शक्य आहे.
उदा. माझ्याकडे तीन किलो तांदूळ आहे व दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे सहा किलो गहू आहे.
          मला एक किलो गहू हवा आहे. त्या व्यक्तीला एक किलो तांदूळ हवा आहे.
          मला व तिला एक एक किलो तांदूळ व गहू आपापल्या साठ्यातून कमी झाला तर काही फरक पडणार नाही.
          आम्ही आपापसात अदलाबदल करू शकतो.
          पैशांचा संबंध न ठेवता, आम्ही हवे ते धान्य मिळवू शकतो.

चर्चेचा मुद्दा - वस्तुविनिमयाने महागाईचा त्रास कमी करता येईल का ? 
तूर्तास, जाणवलेले फायदे व तोटे -
फायदे
१. अशा देवाणघेवाणीमुळे पैशांचे महत्व कमी होईल व वस्तूंच्या किंमती खाली येतील.
२. पैशांचे महत्व कमी झाल्यामुळे माणसाची पैशांची हाव कमी होईल. 
     पैशांशी निगडीत बहुतेक सर्व गणितांचा पुनर्विचार करावा लागेल.  
३. पैशांनेच सर्व सुखे मिळविता येतात, ही भावना नष्ट होईल. 
      पैसे नसले तरी आपण जगू शकतो, हे कळल्यामुळे त्या त्या वस्तूला मिळणाऱ्या भावनिक किंमतीत वाढ होईल.
४. वस्तू स्वतःच देवाणघेवाण करण्याचे साधन बनल्यामुळे तिचीच काळजी घेण्याकडे लक्ष केंद्रित होईल. आदर, प्रेम, सौंदर्य या भावना जागृत होतील.

तोटे-
१. वस्तुविनिमय प्रत्येक वस्तूच्या बाबतीत शक्य नाही.
     उदा. माझ्याकडे टीव्हीचे स्पेअर पार्टस आहेत व दुसऱ्या व्यक्तीकडे रेडिओचे स्पेअर पार्टस् आहेत.
               आम्हा दोघांनाही आपापल्या उपकरणांसाठी नवे स्पेअर पार्टस् हवे आहेत.
               आम्हा दोघांना आपापसात देवाणघेवाण करता येणार नाही. टीव्हीचे व रेडिओचे पार्टस् पूर्णतः निराळ्या उपकरणांसाठी 
               वापरले जातात.
               (धान्याची अंतिम जागा मानवी पोट ही समान असल्यामुळे देवाणघेवाण शक्य आहे.
२. मोजमाप अवघड आहे. 
      धान्याचे मोजमाप किलो या परिमाणाने करणे शक्य आहे. पण, वरील उदाहरणातील वस्तूंबाबत अवघड आहे. 
      क्षणभर गृहित धरू की, वरील उदाहरण शक्य आहे. आम्हा दोघांनाही नेमके तेच पार्टस आपापल्या उपकरणांना पाहिजे  आहेत. म्हणजे, माझ्याकडे जरी टीव्ही असेल तरी माझ्या बिघडलेल्या रेडिओला रेडिओचे पार्टस पाहिजे आहेत. हीच  परिस्थिती  त्या व्यक्तीच्या बाबत उलट.  
       पण,  स्पेअर पार्टस् चे  मोजमाप  कसे करणार ?
      दोन्ही स्पेअर पार्टस् तराजूमध्ये ठेवून वजन समान झाल्यावर देवाणघेवाण करणे, हा एक विचित्र चमत्कारिक मार्ग आहे. 
३. गुंतवणुकीसाठी, पैशांची गरज असतेच. फिक्सड डिपॉझिट म्हणून पैसेच ठेवू शकतो. एक टू व्हीलर फिक्सड डिपॉझिट म्हणून ठेवली आणि एक वर्षाने ती एखाद्या नव्या आरश्यासह मिळाली हे आजतरी शक्य नाही.
      पैसे हा घटक अपरिहार्य आहे.
 ४. सर्वमान्य असा पैसे हा घटक नष्ट झाल्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतील. एखाद्याच्या दृष्टीने जे एक सेंटीमीटर असेल ते दुसऱ्याला मान्य नसेल. म्हणजेच, एकाने एक वस्तू त्याच्या दृष्टीने मोजून दिली तरी दुसऱ्याला ते मोजमापाचे साधन मान्य असेलच असे नाही.
     त्याबाबत एकवाक्यता आणणे, हेच एक महत्कार्य होऊन बसेल.

    ...काय वाटते ?
        ही पध्दत किती व्यवहार्य आहे ?
        पैशांचा संबंध न ठेवता किती वस्तूंची अदलाबदल करता येईल ? 
        समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण, मानसशास्त्र या क्षेत्रांमध्ये कसे बदल होतील ?