(गंधाच्या उलाढाली)

आमची प्रेरणा : कलिंगभूषण यांची बोल्ड ऍंड ब्यूटिफुल गझल 'गंधाच्या उलाढाली'

जरा चुंबावया जाता तिला, मळमळ मला आली
तिच्या तोंडातल्या हुंगून गंधाच्या उलाढाली

तुला जे पाहिजे होते तसे केलेस तू सारे
तुला पुष्कळ मजा आली परी मजला इजा झाली

उभी आहेस तू माहीत आहे पण कुणासाठी ?
कुणी शिट्ट्य़ा तुला मारून जातो खालच्याखाली

रचावे काव्य कोणीही, कुणी मोरीत रेकावे
कुणा थोडे मिळाले मद्य की तो लावतो चाली

रडावे वाचकाने, काव्य वाचुनिया किती वेळा
चला झटकून टाकूयात या अंगावरुन पाली

जरा कोठे निघालो मी, कसा पायास तो ओढी
मराठी माणसाच्या नेहमी का खेकड्या चाली?

पुरेसे काफ़िये केव्हाच माझे जाहले गोळा
नको रे, खोडसाळा, काळजी, कविता, चला झाली!