प्रेरणा : चैतन्य दीक्षितची राहिले दूर, सख्या घर राहिले दूर ही कविता.
जायचे भूर, सख्या चल जायचे भूर,
काळ हा रे लोटला काढुनिया टूर - ध्रु.-
कोणत्या वाटे निघावे नाकळे आता,
अंदमान, केरळ की थेट सिंगापूर - १ -
स्पष्ट मजला दोन सप्ताहांतला दिसतो,
दोन लक्षांहून जादा रूपयांचा धूर - २ -
थांबणे येथेच आता कठिणसे वाटे,
या घरी गर्दीच सारी जायचे रे दूर - ३ -
दोन घटका गंमतीला सवड तू काढी,
या प्रवासाने ऋचाची थांबवी कुरकूर - ४ -