निर्णय

सध्याच्या काळात माणसाचे मन भोवतीच्या वातावरणामुळे संभ्रमित झाले आहे. माणूस म्हणून जगताना अनेक विषय मनाला विद्ध करतात. आपल्या चिंतेचे कारण आपले काही चुकते यात नाही, तर आपल्या मनाची ठेवण ज्या प्रकारे झालेली आहे ती आपल्याला अधिक अस्वस्थ करते.नित्य बदलत्या जगात जुने काय काय जपायचे हे निश्चित ठरवले पाहिजे. एक मराठी माणूस म्हणून कही गोष्टी खरेदी विक्रीच्या पलिकडच्या असतात हे ठाम ठरविले पाहिजे .‍ज्या मूल्यावर आपले पूर्वज प्राणपणाने निष्ठा ठेवायचे ती मूल्ये आपणही  विनाअट स्वीकारली पाहिजेत, येथे व्यक्तीस्वातंत्र्याचे अवाजवी स्तोम न माजविता स्वत:वर  आपणच नैतिक बंधन घालून घेतले पाहिजे. देव, देश ,धर्म, माताभगिनी हे सदैव आपल्या श्रद्धेचे आदराचे विषय असलेच पाहिजेत, यात तडजोड करील तो मराठी माणूस नव्हे अशीच आपली धारणा असली पाहिजे.

धनसाधनेच्या आधी ज्ञान साधना करावी लागते, त्याच्याही आधी शरीरसाधना करावी लागते‌‌  सध्या आपण नेमके उलट्या क्रमाने जातो ‌शरीरम आद्द्यम खलू साधनम असे आपले पूर्वज सांगून गेले आहेत. याची सुरवात मोठ्यानी घरात करून लहानाना घडविले तर आपल्याला उद्याची चिंता करण्याची वेळ येणार नाही.