बहुतेक हा स्वतःला गालीब समजतो पण....

आमची प्रेरणा भुषण कटककर यांची कविता  जो जो प्रवेशला तो गालीब होत गेला....

झाले रवंथ चालू वाचक बरा निघाला
अंदाज आमचा हा भलता खरा निघाला

पाडा रटाळ, गझला,  बकवास शब्द चोथा
नाचा जणू रसाचा मोठा झरा निघाला

बहुतेक हा स्वतःला गालीब समजतो पण
ठाण्यामधील वेडा जो आगरा निघाला

वाटे कवी मला हा आहे बराच मोठा
चिरता फणस निराशा, फुसका गरा निघाला

जुळवून ठेवतो हा यमके मुळात सारी
होता प्रसूत हा अमुचा घाबरा निघाला

ओळी  प्रचंड असती , कोणा न  अर्थ लागे
ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला

आवाज हा दुदंभी मी घाबरून उठलो
जवळून पाहिले तर हा पादरा निघाला

विद्वान "केशवा"ला म्हणती उगाच नाही?
  अपुलाच फेडण्याला हा  कासरा निघाला