छोटी विडंबनं

आमची प्रेरणा मनीषा साधू यांच्या सुरेख  छोट्या कविता  

                                 (छोटी विडंबनं)

१) ह्या अथांग जालावर
      तो एकुलता एक दिवे लावत होता
      गझलेचे

     कशाच्या आधारावर
      तो आणि येव्हढ बरळत होता!

२) वाचक मला व्याकुळपणे सांगत होते
     त्याच्या गझलियतेची कहाणी
     आणि मी
    वाचण्यात तल्लीन होतो
    त्याची गझल
    मुक्तछंदाप्रमाणे!

३) ह्या
     निर्लज्ज "केश्या"ला
     प्रतिसाद कसे मिळतात काय कोण जाणे
    कारण
    माझाच प्रतिसाद
    तेव्हढा आढळत होता
    माझ्या कवितांवर!

४) शब्दांना धरून
      अर्थापर्यंत जावं म्हटलं
      तर लक्षात आलं
     मीच कवी आहे
     आणि वाचक ही
    मग मी
    स्वतःलाच प्रतिसाद बहाल केला!

५) वाच वाच वाचली
      रात्रीच्या कुठल्यातरी घटकेला पाडलेली
     अस्वस्थतेचं सबंध मूळ
     त्या कवितेत आहे असं वाटून

     मग लक्षात आलं
     ती कविता वाचणं
     हेच अस्वस्थतेचं कारण होतं!

६) आता मी काहीही लिहीत नाहीये
     आणि तरीही मी अस्वस्थ नाहीये!