(कविता)

आमची प्रेरणा पुलस्ति यांची कविता आणि भूषणसाहेब कटककरांची इच्छा

वेड्या समान लिहितो तासात सात कविता
टाळू कसे कळेना, होते प्रपात कविता

फुरसत मिळेल तेव्हा कविता लिहीत असतो
कार्यालयात लिहितो, लिहितो घरात कविता

गझला नव्या दमाच्या जाणा कशा लिहाव्या
जमवा जरा कवाफ़ी; पाडा दमात कविता

संपून सर्व जेव्हा जातील काफिये ते
लिहिशील काय त्याही नंतर वह्यात कविता?

कळते अजून कोठे माझी मलाच कविता
कळण्यास का लिहावी आम्ही मुळात कविता

सोडू हिला कसे... पण सोडू तरी कशाला?
असते विडंबनाला 'खोक्या' मुळात कविता!