लाज

टाकलेली लाज
फासलेली लाज

माडीवर आज
विकलेली लाज

टेबलाखालून
सारलेली लाज

नेत्याच्या डोळ्यात
कोळलेली लाज

दाह दहशत
पोळलेली लाज

देशद्रोही ताठ
वाकलेली लाज

आंधळा कायदा
झुकलेली लाज

वासना हल्ल्यात
जन्मलेली लाज

मानवा पाहून
लाजलेली लाज