क्लॉस्ट्रोफोबियाला मराठीमध्ये काय म्हणतात?

क्लॉस्ट्रोफोबियाला मराठीमध्ये काय म्हणतात? तुम्ही क्लॉस्ट्रोफोबिक अहात का? असाल तर त्यावर उपाय काय करता? माझ्या माहितीनुसार त्यावर त्वरित उपाय करता येतील असे वाटत नाही. पण समजा जर तुम्ही क्लॉस्ट्रोफोबिक अहात आणि तुम्हाला MRI/CT Scanning करायचे असेल तर तुम्ही परिस्थिती कशी हाताळता?

मी नुकतीच अशा प्रकारच्या अनुभवातून गेले आहे. मी पूर्णवेळ डोळ्यावर कापडाची पट्टी ठेवली होती. पण अनवधानाने जर पट्टी सरकली असती तर काय झाले असते याची कल्पना करवत नाही. मी चांचणीपपूर्वी त्या यंत्राकडे पाहिले नव्हते. पण नंतर पाहिले आहे. त्यामुळे पुन्हा असा प्रसंग आला तर अधिक काळजीपूर्वक वागावे लागणार असे दिसते आहे.