कारण कधीच नव्हते

टाळ्या हजार पडुनी कशास पाणावलेत डोळे?
अंतर तुझ्या नि माझ्यातले म्हणावे तसे न होते

चंद्रास चांदणी का असेच बोलून काल गेली?
'सारेच तेज होते तुझेच सूर्यास जे मिळाले'

माझ्या-तुझ्या यशाचेच गोडवे गात बोलताना...
तूही असे म्हणावे कि, 'आज तूही तुझे बघावे'?

हकनाक लाविले तू मला सुखाचे व्यसन कराया
कळताच दुःख आधीच त्या सुखाला धरून बसले

मी शिल्पकार नाही कि कोणता चित्रकार नाही
जमण्यास वेदना अंतरात कारण कधीच नव्हते