मी आपण असे का करतो ?

स्वाईन फ्ल्यूची साथ सुरू असल्या पासून रस्त्यावर थूंकणार्‍या लोकांकडे माझे लक्ष आवर्जून जाते. आज मी एक मास्क लावलेला माणूस मास्क काढून रस्त्यावर थुंकतो पुन्हा मास्क लावतो असे पाहिले. रस्त्यावर थुंकणे हा आमचा स्थायीभाव आहे त्याला मी तरी कसा अपवाद असेन. पण बरंच  मागे टिळक वाड्यातील महाराष्ट्र बॅंकेत जाताना जिन्यातील तांबूल रंग पाहून मन विषण्ण होत असे . कालांतराने तो जिना मी स्वच्छ अवस्थेतही पाहिला पण शेवटी टिळकांचे नाव न करून कुणाला सांगतील.

थुंकणे चांगले का वाईट आरोग्य कारक का अनारोग्य कारक या आधी मला काही प्रश्न पडतात

मी/आपण/आम्ही/तो/ते/त्या का सार्वजनिक जागी का थुंकतो/थुंकतात ?

आपण स्वतः: किंवा आपला अत्यंत जवळचा परिचित कधी  सार्वजनिक ठिकाणी थुंकला आहात काय ? हो असेल तर, थुंकण्या मागे नेमके कारण काय होते?

नकोसा
होणारा विचार ?/नकोसे दृश्य ? नकोशी घाण ? नकोसा वास ? कफ /पान /तंबाखू
जन्य पदार्थ / गुटखा ? दुसर्‍या व्यक्तीचे थुंकणे पाहून तुम्हाला कधी
थुंकावेसे वाटते काय?

आपण स्वतः: कधी थुंकला नसाल तर नेमके एखादी
नकोशी(घाण) गोष्ट नजरेस पडल्या नंतर किंवा वास आल्या नंतर तुम्हाला
आलेल्या आवंढ्याचे, कडू पडलेल्या तोंडाचे  कफाचे तुम्ही नेमके काय करता का
असा आवंढा कधी येतच नाही.

काही लोकांना जेनेटीक कारणामुळे अधीक लाळ उत्पन्न होते काय?

कफ प्रकृतीचे लोक कफावर बाहेर थुंकावे लागू नये असे काय वैद्यकीय उपचार करून घेऊ शकतील

दातांचे आरोग्य जिभेची स्वच्छता बरोवर नसल्यामुळे काही लोकात लाळ अधीक निर्माण होते किंवा तोंड कडू होते काय?

माऊथ फेशनर्स चा वापर करणारे कमी थुंकतात असे काही होते काय?

थुंकणे हे इतर व्यसनांसारखे व्यसन आहे काय ?

एखाद्या व्यक्तिचा राग आल्यामुळे तुम्ही राग गिळण्याचा मार्ग म्हणून  रस्त्यावर थुंकता असे कधी होते काय ?

एखाद्या सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या परिचित व्यक्तीस  तुम्ही यशस्वी पणे परावृत्त केले आहे काय ? हो तर कसे ?
एखाद्या सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या अपरिचित व्यक्तीस  तुम्ही यशस्वी पणे परावृत्त केले आहे काय ? हो तर कसे ?