महागाई वाढण्यात कृषी खात्याची जबाबदारी कोणती व किती?

भारतात सध्या महागाई वाढण्यामागे नक्की कोणती कारणे व समीकरणे आहेत हे सर्वांना ज्ञात आहेच!
पण त्यात कृषी खात्याची भूमिका काय? महागाई वाढण्यात त्यांचा वाटा काय?
जर साखरेचे, धान्याचे भाव कोसळले तर त्यामागे कृषी खाते व मंत्री ह्यांचे यश असते. उत्पादन चांगले झाले, पाऊस छान पडला, निर्यात झाली की त्यात कृषी खाते स्वतःची पाठ थोपटून घेते... विशेष करून त्यांचे मंत्री महोदय!
परंतु तेच भाव जर कडाडले तर ती संपूर्ण मंत्रीमंडळाची जबाबदारी, त्या त्या राज्याची जबाबदारी असते....????

दूध, साखर इत्यादींच्या भावांवर जर आपले नियंत्रण नाही तर मग त्याविषयी भाष्य करून मंत्रीमहोदय कोणता देखावा निर्माण करत आहेत?

मला आपली मते, त्यामागील अर्थकारण, राजकारण जाणून घ्यायला नक्की आवडेल!

-- अरुंधती कुलकर्णी

Sing, Dance, Meditate, Celebrate!
दुवा क्र. १