दुर्बीण कोणती घ्यावी?

मला एक दुर्बीण घ्यायची आहे. ती मला दिवसा तसेच रात्री दोन्हीसाठीही वापरायची आहे.

१. दिवसा : पक्षी निरीक्षण, दूरच्या गोष्टी बघणे उदाः डोंगर, समुद्रातील बोट इ.
२. रात्री : आकाश निरीक्षण (फार खोलात नाही. त्यासाठी टेलिस्कोप लागेल.)

मी महाजालावर शोधून काही माहिती मिळवली. त्यात मला माझ्या गरजेप्रमाणे Celestron ची UpClose १०X५० Poro ही दुर्बीण चांगली वाटली. पण मी ह्याबाबतीत नवखा असल्याने थोडा गोंधळ होतोय.

कृपया कोणी मनोगती खालील बाबतीत मार्गदर्शन करू शकतील का?

१. कोणत्या कंपनीची दुर्बीण चांगली आहे?
२. साधारण झूम व ऑबजेक्ट लेन्स काय असावी?
३. अश्या दुर्बिणीची किंमत काय असते? (मी ऐकले आहे की साधारण रू. २००० पर्यंत असते)
४. पुणे/मुंबई/कोल्हापूर इथे (अथवा जवळपास) दुर्बीण कुठे मिळेल?