अभंग

जिवलगांचा जिवलग, भेटला पांडुरंग ।
आणि अंतरीचा रंग, श्रीरंग जाहला ॥

जाहला सोहळा, परब्रह्मभेटीचा ।
जन्म ताटातुटीचा शेवटचा ॥

शेवटचा क्षण जाहलासे सोपा ।
पाहता मायबापा याचि देही ॥

देही-देह गेले विरून श्रीरंगी ।
उरले अभंग- एकरूप ॥

एकरूप देव, भक्त एकरूप ।
सारे आपोआप, सहजचि ॥

(२०१०/०६/२७)