भालचंद्र नेमाडे व त्यांचे विचार

भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदूःजगण्याची एक समृध्द अडगळ' ही कादंबरी १५ जुलैला प्रकाशित होत आहे. 'लोकमत' च्या आजच्या रत्नागिरी आवृत्तीत डॉं. सच्चिदानंद शेवडे यांनी श्री.नेमाडे यांच्यावर केलेली टीका प्रसिध्द झाली आहे. श्री.शेवडे यांच्या बोलण्याचा आशय असाः 

हिंदू व अडगळ हे दोन शब्द एकत्रित आणण्याची गरज नव्हती. श्री. नेमाडे काहीही बोलतात. त्यांना खात्री असते की, हिंदू लोक सहिष्णू आहेत, काहीही बोलले तरी धोका नाही. नेमाडे यांना महाभारत, भागवत आदी ग्रंथ समजलेले नाहीत.

श्री. शेवडे यांनी कादंबरी प्रसिध्दीपूर्वी वाचलेली आहे की नाही, याबाबत बातमीत उल्लेख नाही. श्री. नेमाडे मराठीतील मोठ्या लेखकांत गणले जातात पण तुफान लोकप्रियतेच्या यादीत त्यांचे नाव नसते. त्यांची विधाने बरेचदा वादात सापडतात. 'पु.ल.देशपांडे हे खरे साहित्यिक नाहीत, त्यांनी नुसती विनोदाची शेते पिकविली' असे ते काही वर्षांपूर्वी म्हणाले होते. सत्याला पुढून प्रवेशबंदी केल्यास ते मागच्या दाराने आत येते, अशा आशयाचे त्यांचे विधान आहे.
नेमाडे यांची विचारधारा कशी आहे ?
जड जड बोलतात म्हणून सामान्य वाचकाला नेमाडे कळलेले नाहीत का ?