मुंबईत पडलय तरी काय ?

रोजचे लोकलचे धक्के... गाडी घेण्याची ऐपत असूनही अंतर जास्त असल्याने लोकलच बरी. त्यात ती पावसाळ्यात बंद पडणार. बसने यायचे म्हणजे अजूनच त्रास, खड्ड्यांमध्ये रस्ता शोधण्याची कसरत, आता मलेरियाची साथ, नेहमीच अस्वस्थ करणारे वातावरण, सकाळी गेलेला संध्याकाळी परत येईल की नाही याची शाश्वती नाही, शहराचे बकालिकरण होतेय ते वेगळेच. लोकलमध्ये भैय्याची माजोरी.... छाती मोडून जाईल अशी गर्दी ... न परवडणारी घरं ...

मुलं मोठी होतात, ती गादीतच.. त्यांच्या शाळा.. महागडी शुल्क ... पैसे घे आणि मोकळा हो, पण वेळ नको मागू असं म्हणणारे पालक ...

सकाळी जाणे आणि रात्री केव्हातरी उशिरा परतणे.... २४ तास जागे राहणारे शहर.... ६.१८, ६.२० अश्या ठरलेल्या वेळा....

बाँबस्फोट, दंगल किंवा जातीय तणाव, गुन्हेगारी, कधी काय होईल याची शाश्वती नाही, रोजच लोकलखाली येणारं कोणीतरी ..... अश्या अस्वस्थ वातावरणात 'मुंबईत पडलंय काय? ' असाच प्रश्न मनात येतो.

राजकारण्याची कुठली ना कुठली मोहीम (? ).. मोर्चा, संप, काय त्रास आहे...

२ वर्ष मुंबईत घालवल्यावर 'नको ती मुंबई' झालं अन तिथून निघालो. घडाळ्याच्या काट्याला आयुष्य बांधलंय की काय असं वाटणारं शहर !!! मुंबई बघायला चांगलं शहर आहे, पण राहायला ... नको ... आता कसं शांत वाटतं.... सायकलवर टांग टाकली की कॉलेज ... दुपारी जेवायला घरी ... संध्याकाळी फिरायला वेळ मिळतो ... थोडा पैसा कमी आहे, पण डोक्याला शांतता आहे....

कधीकधी मुंबईचे मित्र-मैत्रिणी आठवतात, त्यांच्या ट्रेकिंगचे इमेल्स येतात, पण .... त्या २ दिवसाच्या पावसाळी सहलीसाठी ... नकोच ... त्यापेक्षा दुसरे छंद जोपासावे... त्यांचे फोटो बघून समाधान मानावे अन घरजवळच्या टेकडिवर ट्रेकिंग करावे