रा.स्व. संघ केलेले कार्य पुढे आणण्यात कमी पडला आहे का ?

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना नुकतीच 'सिमी' शी केली. 

संघाने या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैचारिक मतभेद इतर पक्षांशी होते, यापुढेही राहतील पण संघाची शिस्तबध्दता आणि त्याचे समाजकार्य इतर पक्षांचे जाणते नेते मान्य करतात. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील काही काळ संघात होते. इंदिरा गांधींनीही संघाच्या समाजकार्याची दखल घेतली आहे. त्यांच्या कार्याची माहिती मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये पसरत नसल्याने कदाचित् राहुल गांधीं यांनी केलेल्या वक्तव्यासारखी वक्तव्ये होतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःचे कार्य लोकांपुढे आणण्यात कमी पडला आहे का ?