माइंड मॅप

गेली ४ वर्षे मी "फ्री माइंड" नावाचे साधन (सॉफ्टवेअर टूल) माझ्या कार्यक्षेत्रात वापरते आहे. हे साधन माइंड मॅप या प्रकारात मोडते. याचा उपयोग मेंदूतील विचार अतिशय सुसंगत आणि सुस्पष्ट तसेच आकर्षक रीतीने कागदावर उतरविण्यात होतो. विचार आपले आपल्याला खरोखर खूप स्पष्ट होतात. विचारांची दिशा आणि विचारसमूह ओळखू येऊ लागतात. एखाद्या ठिकाणी विचारसाखळी तुटली असेल (गॅप) तर लगेच लक्षात येते. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून, हे साधन वापरून, कोडिंग अथवा टेस्टिंग चे रिक्वायरमेंटस बरोबरचे कव्हरेज बऱ्याच अंशी साध्य करता येते.
या साधनाचे काही गुणविशेष हे की -
(१) आकर्षकता
(२) फ्री फॉर्मॅटिंग
(३) मुख्य शब्द (की वर्डस) सहज सापडणे
(४)महत्त्वाच्या मुद्द्यावर भर (एंफसिस)
यामध्ये एक मध्यवर्ती नोड असतो आणि त्या नोडला फांद्या फुटून चाइल्ड नोड फुटतात. चाइल्ड नोड ला, सिबलिंग नोड असू शकतो अथवा चाइल्ड नोड. अशा रीतीने एखादी कल्पना मूळ गाभ्यापासून फांद्या फुटत विकसीत होते.
हे इथे सांगायचं कारण की हे साधन लहान मुलांकरता देखील अतिशय उपयोगी आहे. तसे सर्वांकरताच आहे. माइंड मॅप चे संशोधक टोनी बुझान यांनी लहान मुलांकरता लिहिलेले एक पुस्तक देखील बाजारात उपलब्ध आहे. मुलांना तर जरूर या साधनाची सवय आणि वळण लावावं.
टोनी बुझान यांची पुढील चित्रफीत पाहण्याजोगी आहे. अप्रतिमच आहे.

 दुवा क्र. १