भविष्यात कादंबरीला वाचकवर्ग राहील का ?

वाचन कमी झाले आहे, अशी चर्चा होते. वाचन कमी झाले नसून वाचनाचा प्रकार बदलला आहे, असे निरीक्षण वाचकांकडून, लेखकांकडून व प्रकाशकांकडूनही  नोंदवले जाते. व्यक्तिमत्त्व विकास, ज्योतिष, संभाषणकला, आत्मचरित्र, संगणक तंत्रज्ञान या विषयांवरील पुस्तकांना मागणी वाढली असल्याचे सांगितले जाते. कविता, कथा व कादंबरीची मागणी कमी झाल्याचे सांगितले जाते. जीवनाची गती वाढत असल्याने वाचकांना हे वाचायला वेळ नाही, असे समर्थन केले जाते.

कथा व कविता या साहित्यप्रकारांची लांबी कादंबरीच्या तुलनेत कमी असल्याने वाचक वेळात वेळ काढून वाचतीलही, असे गृहित धरुया. 
भविष्यात कादंबरीसारख्या वाचनासाठी खूप वेळ आवश्यक असणाऱ्या साहित्यप्रकाराला वाचकवर्ग राहील का ?
या विषयाशी आणखी कोणते पैलू निगडीत आहेत ?