पायाखालचा दगड

पायाखालचा दगड तू 

तो उभा तुझ्यावरी
तू उभा कोणावरी
ठाऊक नाही आजवरी 
आजचा उभा तू 
उद्याचा दगड ठरशी
युगानुयुगे वाढ अशी 
परी तुला जाण नाही 
पडण्याची भीती नाही
हे आठवे आश्चर्य पाही
व्हायचे दगड जरी 
का कष्टविसी जिवा परी ?
काही असती संगमरवरी
काही निव्वळ खडकापरी
काही निसरडे घसरडे
काही नुसतेच शेवाळले
काही वाळूचे बनले
काही धुळीचे बनले
काही पाण्हेरले ओले
तर काही रक्ताळलेले
जीव ओतुनी जीवनात
फत्तर होणे नशिबात 
उंच गेलो जरी कितीही
दिसते अथांग पोकळी
आस प्रगतीची धरूनही
पोकळीच उरे शेवटी
तिच्यातच उडत राहशी 
तिच्यातच विलीन होशी