गव्हले

  • रवा ४ चमचे
  • मैदा २ चमचे
  • साजुक तूप १ चमचा
  • अगदी थोडे मीठ
  • पीठ भिजवण्यापुरते दुध
१ तास
४ जण

मार्गदर्शन : रवामैद्यामध्ये साजूक तूप व अगदी थोडे मीठ घाला. पीठ भिजवण्यापुरते दूध घ्या आणि घट्ट पीठ भिजवा. पीठ झाकून ठेवा. हा रवामैदा २ तास मुरू द्या. नंतर त्याचे गव्हले वळायला घ्या. गव्हले वळताना दुधाचा हात घेऊन पीठ मळून घ्या. व पिठाची एक पातळ सुरनळी बनवा. सुरनळ्या अगदी छोट्या छोट्या घेतल्या तरी चालेल. डाव्या हातात सुरनळीचे टोक घ्या व डाव्या हाताची २ बोटे वापरा वळायला. अंगठा व त्याशेजारील बोट आणि उजव्या हाताच्या २ बोटांनी वळलेल्या सुरनळीचे बारीक बारीक तुकडे पाडा. तुकडे पाडताना पण ते वळून घ्या. दोन्ही हाताने सुरनळी वळली जाऊन गव्हले पाडा. उजव्या हाताची पण तीच दोन बोटे वापरा. अंगठा व त्या शेजारील बोट. हे गव्हले साधारण तांदूळ ज्याप्रमाणे दिसतात तसे वळले गेले पाहिजेत. बारीक आणि पातळ. वळताना खाली एक पेपर ठेवा म्हणजे वळता वळता गव्हले या कागदावर पडतील. ते असेच वाळू द्या. याला उन्हाची गरज लागत नाही. कडकडीत वाळले की डब्यात भरून तो फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे जास्त दिवस टिकतील. या गव्हल्यांची खीर बनवतात शेवयांसारखी. लग्नकार्यात गव्हले करतात. कोणतेही शुभकार्य असल्यास गव्हले करून त्याची खीर करतात.

टीपा नाहीत.

सौ आई