मनोरम चांदण्या राती निजू नाहीत देत मला

मनोरम चांदण्या राती निजू नाहीत देत
मला

तुझ्या त्या प्रीतिच्या गोष्टी निजू नाहीत देत मला ।ध्रु।

तुझ्या त्या रेशमी केशी मनोसुमने फुलायाची
वसंत ऋतूत भेट कधी तुझी माझी जुळायाची
जुन्या त्या आपल्या भेटी - निजू नाहीत देत
मला
।१।
तुझ्या त्या प्रीतिच्या गोष्टी निजू नाहीत देत मला ...

असे न घडो कि आज मनी जळाने आग लागावी
दया येऊन मेघांनी स्वतःची वाट बदलावी
स्मृतींच्या ह्या अथक वृष्टी - निजू नाहीत देत
मला
।२।
तुझ्या त्या प्रीतिच्या गोष्टी निजू नाहीत देत मला ...

टीपा :

१. येथे मनःसुमने / मनस्सुमने असे काहीतरी हवे होते. तेही वृत्तात/चालीत बसेल. मनोसुमने जरा गोड वाटले म्हणून लिहिले.

२. मूळ गाण्यात असा काही शब्द नाही. येथे रिकामी जागा भरून काढण्यासाठी भर घातली  

३. येथे मनोहर असेही चालेल

४. हे पुष्कळ प्रकारे करता येते
उदा.
मला न निजायला देती
मला निजण्यास
ना देती
निजाया ना मला देती
वगैरे.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (लगागागा लगागागा लगागागा लगागागा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... टी (किंवा ती) लगागागा लगागागा असे जमवा बरका!  यमकाची जागा ठळक केलेली आहे.