मला येथे लिहिता येईल का?

मला येथे लिहिता येईल का?


हो. का नाही येणार? किंबहुना तुम्हाला येथे मराठी लिहिता यावे म्हणून तर हा सारा प्रपंच मांडला आहे. केवळ इथे लिहिलेले वाचून सोडून देण्यापेक्षा इतरांनी लिहिलेल्य लेखांवर प्रतिसाद देण्याने, प्रस्तुत चर्चांमध्ये भाग घेऊन आपले म्हणणे आवर्जून मांडण्याने आणि आपले साहित्य, अनुभव वगैरे मजकूर इतरांना वाचायला, त्यावर अभिप्राय द्यायला उपलब्ध करून देण्याने तुम्हाला नक्कीच जास्त आनंद होईल ह्याची आम्हाला खात्री आहे.


एकदा तुम्ही सदस्य झालात, आणि ह्या संकेतस्थळी आल्यावर तुमच्या येण्याची नोंद तुम्ही केलीत, की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लेखन येथे करता येईल.


'लेखन करावे' ह्या पर्यायावर टिचकी मारलीत की दिसणार्‍या यादीतून योग्य तो पर्याय निवडा. सध्या खालील प्रकारचे लेखन करणे शक्य आहे.


प्रतिसाद


इतरांच्या साहित्याला प्रतिसाद देणे, अभिप्राय व्यक्त करणे, सूचना करणे, आक्षेप घेणे किंवा प्रस्तुत चर्चेत भाग घेऊन आपले म्हणणे मांडणे हे तुम्हाला करता येईल. त्यासाठी इतरांचे साहित्य वाचल्यावर त्याच्या आसपास दिलेल्या दुव्यावर टिचकी मारलीत की तुम्हाला हे लिहिता येईल.


चर्चेचा प्रस्ताव


व्यासपीठ म्हणजे जिथे सदस्यांना एखाद्या विषयावर आपसात विचारांची देवाणघेवाण करता येईल, असे सूत्रबद्ध चर्चेचे स्थान. अश्या व्यासपीठावरच्या चर्चेसाठी तुम्हाला येथे नवा प्रस्ताव लिहिता येईल.


साहित्य


वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकांमध्ये ज्या पद्धतीचे साहित्य प्रकाशित होते, (म्हणजे हकीगत, लेख, कथा कविता, अनुभव, वगैरे वगैरे) तश्या पद्धतीचे लिखाण तुम्हाला येथे करून प्रसिद्धीला देता येईल. आणि इतरांना त्याचा आस्वाद घेऊन अभिप्राय पाठवता येईल.