सांजेला तू खिडकीखाली शीळ घालणे सोडुन दे

नायिका :
सांजेला तू खिडकीखाली शीळ घालणे सोडुन दे
नायक :
तूही खिडकीतून सदोदित बाण मारणे सोडुन दे ।ध्रु।

नायिका :
माझ्या गल्लीतून मारसी रोज रोज का फेऱ्या तू?
नायक :
खरे सांगु का? तुला पाहणे हा केवळ असतो हेतू!
नायिका :
जा जा शुद्धीवर ये! असले येणे जाणे सोडुन दे ।१।

नायिका :
एक सांग तुजला असते हे काय काम माझ्याशी रे?
नायक :
एवढेच तुज म्हणणे की तू माझी होउन टाक बरे!
नायिका :
भल्या माणसा, असल्या गोष्टी मनी आणणे सोडुन दे ।२।

नायक :
कधी ना कधी फळास येइल साधना चार महिन्यांची
नायिका :
जा रे जा डाळ तुझी येथे कधीच नाही शिजायची
नायक :
मनवेड्यांना, धुंदितल्यांना धाक घालणे सोडुन दे।३।

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : भाषांतराची चाल मूळ गाण्याप्रमाणे नाही. भाषांतराची चाल - गागागागा गागागागा गागागागा गागागा अशी साधी सोपी ठेवलेली आहे.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...    णे  असे जमवा बरका!   यमकाची जागा ठळक केलेली आहे.