पुस्तक ओळखा : एक खेळ

पुस्तक ओळखा हा खेळ आम्ही लहानपणी एक बैठा खेळ म्हणून खेळत असू. इथे मनोगतींसाठी हा खेळ सुरू करत आहे.

या खेळात एका पुस्तकाचे (कथा, कादंबरी, कवितासंग्रह काहीही चालेल) नाव उलटेपालटे करून दिले जाईल. पुढील सदस्याने ते ओळखायचे आहे. पुस्तक ओळखल्यावर तो नवीन कोडे घालेल.

खेळाचे नियम :
१. पुस्तकाच्या नावात जेवढे शब्द आहेत तेवढेच वापरावेत.
२. प्रत्येक शब्दातील अक्षरसंख्या तेवढीच असावी असे नाही.
३. भिन्न शब्दांतील अक्षरे वापरून शब्द बनवण्यास हरकत नाही. पण एकूण शब्दसंख्या तीच ठेवावी.
४. ऱ्हस्व व दीर्घ अक्षरे मूळ शब्दाप्रमाणे ठेवावी. (यासाठी कदाचित शुद्धीचिकित्सक बंद करावा लागेल.)
५. एकाच प्रतिसादात आधीच्या कोड्याचे उत्तर आणि नवीन कोडे लिहावे.

तर पहिले कोडेः

मशिगराशि