कृपया अर्थ सांगावा

रवींद्र जैन यांनी अमिताभ बच्चन व नूतन अभिनीत सौदागर चित्रपटात हर हसीं चीज का मै तलफगार हूँ...हेगीत रचले व संगीतबध्द केले आहे. 

त्याचे शब्द मला जसे ऐकू येतात तसे खाली लिहीत आहे.

हर हसीं चीज का मै तलफगार हूँ
रस्ता फूलोंका, गीतोंका बीमार हूँ

या दोन ओळींपैकी पहिल्या ओळीचा अर्थ समजतो. दुसऱ्या ओळीचा मला समजलेला नाही.
कृपया, समजावून सांगावा.
माझ्या ऐकण्यात चूक होत असेल तर बरोबर ओळीही सांगाव्यात.