सजणा रे मनरमणा - हृद्गत ऐकुन घे ना

सजणा  रे.. सजणा
सजणा  रे.. सजणा
सजणा  रे.. सजणा
सजणा रे मनरमणा (सजणा)
हृद्गत ऐकुन घे ना (सजणा)
सगळे जग हरले माझ्याशी, मी हरले तुजसि मना (सजणा) ।ध्रु।
(निस्तल निस्तल चक्षुवंता... चंचल चंचल चक्षुवंता... )

अरे हो हो ... दिन दिन मी मोजत असे सदा (सदा .. सदा ... सदा ...)
हो ... ... जेव्हापासुन तुज असे फिदा (ह्म ...)
ऐकुन घे की राजा (राजा)
झालास न तू माझा (माझा)
 नाहीतर काय मिळे जगि ना२,३ ।१।
सजणा रे मनरमणा ...

अरे हो हो ... पाहत हिरवी ओढणी बसे (बसे ... बसे ... बसे ... )
हो ... भरले बाहू दाखवीतसे (ह्म ... )
कर की रे स्पर्श मला (मजला)
इतका का राग तुला? (तुजला)
मरताहे जी मार तिला ना ।२।
सजणा रे मनरमणा ...

अरे हो हो ... नस नस भडके आतुनी प्रिया (प्रिया ... प्रिया ... प्रिया ... )
हो  ... वणवा जणु पेटे तनी प्रिया (ह्म ... )
का लावसि आग मला (मजला)
माझी लागेल तुला (तुजला)
जळता विझता ऱ्हा शांतिविना ।३।
सजणा रे मनरमणा...

अर्थ :

६. निस्तल = खोल

पर्याय :

७. भेदक भेदक चक्षुवंता... मादक मादक चक्षुवंता (हे जरा जास्तच स्वैर होते हे
खरे आहे मात्र गाण्याच्या एकंदर बाजाकडे पाहून एवढे स्वातंत्र्य घ्यावेसे
वाटले

१. दिन दिन मी मोजत सदा असे
जेव्हापासून मज तुझे पिसे

२. न घडेसे काहीच जगी ना

३. ह्या कडव्याची शेवटची ओळ नेमकी काय आहे आणि तिचा अर्थ काय घ्यायचा हे नीट समजून सांगा बरे! मला पटले तितपत मी भाषांतर केलेले आहे.

४. ह्या कडव्याच्या पहिल्या ओळीचेही वरील ३ प्रमाणेच. (आणखीही एका गाण्यात असेच शब्द आहेत तिथेही मला हवे आहेत)

५. तुझिया विझण्या जळण्या खळ ना

टीपा :

नायिकेबरोबर अभिनायक आणि अभिनायिकांचे चमूही गात आहेत. त्यांचे शब्द म्हटल्यावाचून गाणे चालीत म्हणता येणे अशक्य आहे. ते शब्द ह्या रंगात आणि कंसात लिहिलेले आहेत.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चालः   मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक निदान ...   ना किंवा णा असे जमवा बरका!   यमकाची जागा ठळक केलेली आहेच.