रंग

रंग 

अग,सांभाळा ,सांभाळा पदर सांभाळा 
म्हणता न सावरता रंग सांडला जांभळा   
पदरा आड, सुटली गाठ, धावा धावा 
वाजला पावा, घुमू लागला पारवा 
डोलती बघा या चित्तपावन ललना 
येईल निळा-सावळा, करत कल्पना 
थबकल्या, थरथरल्या मनोमनी 
चढला रंग हिरवा पानोपानी-पानोपानी 
झटकली पिवळी पाने,लटकली आम्र-तोरणे 
न अमलताशाच्या पिवळ्या झुपाक्यांचे डोलणे
नाना रंगी फुले,नारंगी ती वसनं
सुरंगी सुगंध, सारंगीची तान 
घातले  गोमायांचे सडे,रंगली रांगोळी 
रंगांनी भरले लाल घडे,होळी आली होळी 
अग, चला लगबग, सांभाळा सांभाळा 
सतरंगांना ह्या उधळा .....उधळा ......
                   विजया केळकर ____