कॉन्स्टेबलचं ऐकून पुढची कारवाई स्थगित करायला किंवा पुढे ढकलायला ते काही हलक्या कानाचे नव्हते. प्रत्यक्ष परिस्थिती, सूक्ष्म निरीक्षण आणि संबंधित माणसांशी बोलूनच इन्स्पेक्टर सुराडकर निर्णय घेत असंत. म्हणून तर ते खऱ्या गुन्हेगारा पर्यंत पोहोचू शकत असंत. त्यांच्या कोणत्याही तपासात विनाकारण साधारण माणसाला त्रास झाला नव्हता. असो.......
गाडी सुराडकर साहेब, राजमाने, आणि एकदोन कॉन्स्टेबल्सना घेऊन निघाली. दहा पंधरा मिनिटांतच ते चाळीजवळ पोहोचले. मी कामावर होतो.
गाडीचा आवाज ऐकून विशाखा बाहेर आली. येणाऱ्या पोलिसांना पाहून तिने घराबाहेर टाकलेला पाय आत घेत दरवाजा लावून घेतला. अचानक पोलिसांना पाहून ती घाबरली. सुराडकरांच्या नजरेतून ते सुटलं नाही. पण सामान्य माणसं घाबरट असतात, हे त्यांना माहिती होतं.
राजमानेंनी पुढे होऊन दरवाज्या उघडला. मग ते सगळेच आत शिरले. रात्रीचे नऊ वाजत होते. तसा खोलीत फार पसारा नव्हता. फक्त एक खुर्ची खाली पडली होती. आणि खुर्चीजवळ ठेवलेला पाण्याचा ग्लास फुटला असावा.
ते पाहून इन्स्पेक्टर स्वयंपाकघरात शिरत म्हणाले, "आणखी वेगळा पुरावा काय हवाय.? नक्कीच तुमच्या मिसेस खुर्ची वर बसल्या असतील. त्यांना ओढून नेलं असावं आणि खुर्ची पडली असावी."
नंतर ओट्याकडे बोट दाखवत म्हणाले, "ते पाहा वाढलेलं जेवणाचं ताट. त्या जेवायला बसणार असतील तेवढ्यात बेल वाजली असेल आणि मिसेस घाईघाईने दरवाज्या उघडायला गेल्या असतील. तेव्हासुद्धा खुर्ची पडली असावी. त्यांना कशा नेल्या हे सांगणं कठीण आहे."
त्यावर राजमाने म्हणाले, "या सगळ्या शक्यताच आहेत. पुरावा काय?"
इन्स्पेक्टर म्हणाले, "सध्या तरी एवढाच अंदाज बांधता येतोय."
...." हो, पण तिला पळवली असं म्हणता येत नाही. आणि ती घरातून बाहेर गेली असंही म्हणता येत नाही."
हा मनुष्य अगदीच निराशावादी आहे असं वाटून सुराडकर वैतागून म्हणाले, "सध्यातरी एवढंच सांगता येईल. थांबा अजूनही काहीतरी सापडेलच."
आणखी काही वेळ त्यांनी इकडेतिकडे पाहण्यात घालवला. काहीच सापडत नाही असं वाटल्यावर ते निघाले. बुटात पाय घालता घालता त्यांचा थोडा तोल गेला आणि त्यांचा पाय बाहेरच्या पायपुसण्यावर पडला. त्यांना कोणती तरी अणकुचीदार वस्तू लागली. वेदना दाबून त्यांनी ती उचलली.
ते होतं कानातलं इयरिंग. त्याचं टोक पायातून काढीत त्यांनी ते राजमानेना दाखवून म्हणाले, "पाहिलंत, मी म्हंटलं ना काहीतरी सापडेल. आता त्यांना पळवताना झालेल्या झटापटीत हे पडलं हे नक्की, नाहीतर ही वस्तू इथे कशी येईल?"
त्यावर राजमाने काहीच बोलले नाहीत.
"आता चला परत पो. स्टेशनला."
असं म्हणून त्यांना घेऊन ते गाडीत बसले.
पोहोचल्यावर राजमानेंना, "दिवसभर तुम्ही कुठे कुठे होतात?" असं विचारलं.
त्यावर भडकून ते म्हणाले, "कुठे म्हणजे ऑफिसमध्ये होतो."
...."कशावरून? कशा वरुन तुम्हीच किडनॅपरला सुपारी देऊन हे काम केलं नसेल?"
आता मात्र राजमानेंनी हात जोडीत म्हंटलं, "तुमच्या कल्पना शक्तीची मी दाद देतो. तुम्ही पोलिस ऑफिसर होण्यापेक्षा एखादा साहित्यिक व्हायला हवं होतं. आणि माझ्या बायकोला पळवून नेण्याची सुपारी देण्यात माझा काही तरी फायदा असायला हवा, नाही का?"
.....त्यावर सुराडकर म्हणाले, "आम्हाला सगळ्या शक्यता विचारात घ्याव्या लागतात, कारण समोरचा माणूस काहीही करू शकतो. बोला, आजच्या दिवसाची सकाळपासूनची तुमची दैनंदिनी काय होती?"
...."अहो मी फक्त तक्रार नोंदवायला आलोय."
...."हे पाहा तुमचं आजचं रुटीनही सांगा, आणि तुमच्या कंपनीचं नाव, पत्ता आणि फोन नंबरही लागेल. हे एकदा क्लिअर झालं की घेऊ तक्रार नोंदवून."
शेवटी राजमानेंनी कंपनीचा पत्ता आणि नंबर दिला.
***********************‡***********************************
सात साडेसात पर्यंत जमनाचा पोरींबरोबरचा हिसाब किताब चालायचा. मग ती तो गल्ला घेऊन तिच्या खास बनवलेल्या रुम मधे जायची. तिथे मात्र येण्याची कोणालाही परवानगी नव्हती. अगदी नारायणला सुद्धा.
तिने त्या रुमचा दरवाज्या उघडला आणि इकडे तिकडे पाहून दरवाज्या आतून लावून घेतला. आतमधील समोरच्या भिंतीवरील कळ तिने दाबली. त्यासरशी भिंतीवरील जंगलाचा देखावा लावलेली एक चौकट उघडली. आतल्या एका लहानशा जिन्याच्या पाचसहा पायऱ्या चढून तिने बटण दाबले आणि सरर्रऽऽ...ऽऽ आवाज करीत एक लोखंडी दरवाज्या उघडला गेला.
एका लहानशा लोखंडी खोलीत कितीतरी नोटांची बडलं पडली होती. त्यात तिने आणलेली रोकड टाकली. आणि अनिमिष नेत्रांनी त्या संपत्ती कडे बघत राहिली. आत कितीतरी सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने पडले होते. कोणी गहाण ठेवलेले आणि पैशै परत न देता आल्याने नंतर जमनाचे झालेले.
एवढ्या पैशाचं ती काय करणार होती? कुणास ठाऊक. पण तिचा हिशोब पक्का होता. ती आत्ता तो आठवणार नव्हती. कारण तिच्या डोक्यात पाच लाख चोळत होते. तिने रुमला लॉक लावले आणि जिने चढून वर आली.
.....खरंतर या रुम बद्दल कोणालाच माहीत नव्हतं. बाजूला खास जमनसाठीचं बाथरुम होतं. ते दुसरं कोणी वापरण्याचा प्रश्नच नव्हता.
जरी आजपर्यंत इथे जमनाला जाताना कोणीच पाहिलेलं नव्हतं तरी एक व्यक्ती अशी होती की जिने तिला पाहिलं होतं. ती होती राजस्थानहून आणलेली थोडी कम उमर अल्लड आणि किंचित डोक्यावर परिणाम झालेली, बऱ्या अंगलटीची मुलगी.
पण जमना कोणालाही एकदम " डिस्कार्ड " करीत नसे. कारण तिचा स्वतःच्या बोलण्यावर विश्वास होता. आणि का नसावा? तिने आत्ता पर्यंत वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणांतून स्वतः ला आणि जमनलाही बाहेर काढलं होतं.
जमनाला हल्ली एक वेगळाच प्रॉब्लेम निर्माण झाला होता.
...............जमनची बायको सारखी पैशासाठी फोन करायची. ती कुणाला तरी पाठवून पैसे मागायची. नाही दिले तर पोलिसांत जाण्याची धमकी द्यायची.
एक दिवस जमनान्ने गोड बोलून तिच्याकडे काय इन्फर्मेशन आहे ते विचारलं. तेव्हा तिला कळलं की जमना आणि जमन या दोघांनी संगनमताने एका राजकारणी दलालाची हत्या केली होती.
जेव्हा जमन आणि जमना एकमेकांच्या प्रेमात पडले होते तेव्हा नैनिताल इथे विश्वेश्वर शेटला संपवलं होतं. कारण तो जमनाच्या बायकोची इस्टेट लुबाडल्याचं प्रूफ आहे म्हणून ब्लॅकमेल करायचा. ते कितपत खरं होतं माहीत नाही. पण दोघांनी घाबरून जाऊन त्याला कड्यावरून ढकलून दिला. मग मात्र तो मेलाय का जिवंत आहे, हे सुद्धा पाहिला ते थांबले नाहीत.
दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आत्महत्या असल्याचं जाहीर केलेलं त्यांनी पेपरात वाचलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला होता.
आणि या घटनेचा व्हीडिओ जमनच्या बायकोकडे आहे असं तिने सांगितलं होतं. आता फक्त तिला फायनल पैसे देऊन तो व्हिडिओ डिलीट करून घ्यायचा हे एकच काम राहिलं होतं. म्हणून तर तिनी जमनच्या बायकोला उद्या संध्याकाळी सहा वाजता बोलावलं होतं आणि जमनलाही.
सकाळचे साडेनऊ वाजले होते. तिने कीचनमधून नाश्ता मागवला.
अर्ध्या तासानंतर ती अंघोळीला जाणार तेवढ्यात त्या राजस्थानी मुलीचा आरडाओरडा खोलीत सुरू झाला.
तिला एका खोलीत वाटेला बांधली होती. तिच्या खोलीत क़णीतरी गिर्हाईक पाठवलं होतं. जमनाने सक्त ताकीद दिली होती, तरी कोणीतरी हा चावटपणा केला होता.
तिच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या. ती धावतच त्या पोरीच्या खोलीकडे गेली. तिथे बऱ्याच पोरी घोळका करून उभ्या होत्या. एकेकीला बाजूला सारून ती खोलीत शिरली.
करड्या आवाजात विचारले, "किससे? मुझसे पंगा लेना है? आओ सामने."
असं म्हंटल्यावर एकेक करीत सगळ्याच पोरी रुममधून बाहेर पडल्या.
गिर्हाईक तेवढं जमनाचा रुद्रावतार पाहून थरथरत उभं होतं. तो एक फाटका म्हातारा होता.
त्याला कडक आवाजात जमना म्हणाली, "तेरेकू क्या अलगसे बोलेना पडेगा? चल निकल. भोसडीके हरामी."
जमना सहसा शिव्या देत नसे.
म्हातारा गेल्यावर तिने आपला मोर्चा राजस्थानी मुलीकडे वळवला.
......पण तेवढ्यात मुख्य दरवाज्या वरची बेल वाजली.
जमना लगबगीने हॉलमध्ये आली.
..........दारात पोलीस उभे होते.
आत येत सिनीयर इन्स्पेक्टर म्हात्रे आणि शिंदे हातातील सर्च वॉरंट दाखवीत दोन महिला कॉन्स्टेबल्स, सोशल वर्कर विद्युतबेन शहा यांच्या सहीत आत शिरले.
विद्युतबेनला पाहून गुजराथी मधे जमना म्हणाली, "आवजो ना विद्युत बेन, पधारोनी हमारे गरीबखानेमे."
पण विद्युतबेनने तिच्याकडे तोंड वाकडं करुन दुर्लक्ष केलं. "तिला एका धंदेवालीने इतकी सलगी केलेली आवडली नाही."
तिच्याकडे दुर्लक्ष करून तिने इन्स्पेक्टर म्हात्रे ना विचारलौ, "काय साफ हप्ता पोचला नाय काय?"
त्यावर म्हात्रे म्हणाले, "हे बघ जमना आमच्या कडे इन्फॉर्मेशन आहे. पोरींना कुठे लपवून ठेवलौस ते सांग. आणि बाहेर घेऊन ये. म्हणजे आमचौ काम सोपं होईल."
.....ते ऐकून बनेल जमनाने जबाब दिला, "अरे साब कौनसी पोरी, कौनसी करत? यहॉं तो कोई आयाच नी."
पोरीला कुठे लपवायचे या विवंचनेत ती होती. मग तिने कमिशनर शहा साहेबांना फोन लावला. दहा पंधरा मिनिटे गुजरातीत गुडगुड गुडगुड केलं.
मग कमिशनर साहेबांच्या सांगण्यावरून फोन म्हात्रेंना देत म्हणाली, "बोला. सायबाशी."
म्हात्रे बोलायला लागल्यावर ती पटकन विजेसारखी आत पळाली.
भराभर जाऊन जमलेल्या पोरींना दम देऊन पळवून लावल्या.
मग त्या वेडीला खेचतच तिने जमनच्या बाथरूम जवळच्या एका कोठीच्या रुममध्ये आणली. आतल धान्याची पोती कशी तरी बाजूला सारून तिला आत कोंबली. वर पोती लावून कोठीचा दरवाजा कसातरी बंद केला.
आणि ती हॉलिडे निघाली.
जाता जाता तिने नारायणच्या नावाने लाखो शिव्या घातल्या!
(क्रमश:)