सिमलामसाला

  • सिमला उर्फ ढब्बू मिरची २ मोठ्या(जाड्या)
  • लाल तिखट १ चमचा, धने-जीरे पावडर १ चमचा, गरम/गोडा मसाला १ चमचा,
  • दाण्याचे कूट, ओला नारळ, चिरलेली कोथिंबीर प्रत्येकी अर्धी वाटी
  • चिंचेचा दाट रस अर्धी वाटी, गूळ (छोट्या लिंबाएवढा)
  • मीठ
  • तेल, मोहोरी, हिंग, हळद (फोडणीसाठी)
३० मिनिटे
२ जणांना

सिमला उर्फ ढब्बू मिरची बारीक चिरणे. नेहमीपेक्षा तेल थोडे जास्त घेवून तेलाच्या फोडणीमधे चिरलेली सिमला मिरची घालून ३-४ वाफांमधे शिजवून घेणे. नंतर त्यात लाल तिखट, धने-जीरे पूड, गरम किंवा गोडा मसाला, गूळ, चिंचेचे पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून परतणे. नंतर त्यात कोथिंबीर, ओला नारळ, दाण्याचे कूट, घालुन परत १-२ वेळा वाफ देवून परतणे.

अशी ही आंबट-गोड भाजी ज्वारीच्या किंवा तांदुळाच्या भाकरीबरोबर  चांगली लागते, शिवाय नुसती खायला पण छान लागते.

रोहिणी

नाहीत

स्वानुभव