पल्ली (डोसा चटणी)

  • एक वाटी शेंगदाणे
  • लसूण एक पाकळी
  • ४ हिरव्या मिरच्या
  • २ लाल काश्मिरी मिरच्या
  • चिंच
  • फोडणीकरिता जिरे,मोहरी,कडीपत्ता व तेल, चवीपुरते मीठ व साखर
१५ मिनिटे
४ जणांना

मंद आचेवर शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावेत. शेंगदाणे भाजत आले कि, त्याच तव्यावर ४ हिरव्या मिरच्याही भाजायला ठेवा. नंतर शेंगदाणे,लसूण,हिरव्या मिरच्या,चिंचेचा कोळ,मीठ व साखर घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या. गरजेपुरते पाणी घालून परत एकदा फिरवून घ्या.
नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून त्याला वरून जिरे, मोहरी ,कडीपत्ता व कश्मिरी मिरच्यांची फोडणी द्या. पल्ली उर्फ शेंगदाण्याची चटणी तयार. ही चटणी सेट डोश्याबरोबर एकदम छान लागते. सोपीही आहे. १५ मिनिटात तयार.

यात लसूण फार घालू नये. एका वाटासाठी एक पाकळी किंवा त्यापेक्षा कमी ही पुरे होते.

दाक्षिणात्य मैत्रिण रमा