सफेद हत्ती आणि काळी मुंगी

एकदा सफेद हत्ती आणि काळी मुंगी यांची क्रीकेट्ची मॅच लागते. सफेद हत्तीची बॅटींग असते आणि मुंगीची बॉलींग.खूप वेळ होतो, हत्ती आउट होत नसतो. तो खूप रन बनवतो.दुपार होते तरी तो खेळतच राहतो. मुंगी हैराण होते. ती विचार करते की हत्तीला आउट कसे करायचे. नन्तर तीला एक आयडीया सुचते. टाइम प्लीज करून ती सफेद हत्तीकडे जाते आणि त्याच्या कानात काही तरी सागंते. ते ऐकून हत्ती मॅच हरलो असे सागूंन धूम पळून जातो. कुणी सागेंल मुंगी त्याच्या कानात काय सागंते?


....................


विचार करा


............


.....................


ओके


....


मुंगी सफेद हत्तीला सागंते, " अरे सफेद हत्ती, उन्हात जास्त खेळू नकोस; काळा होशील !!!"