परप्रांतीयांमुळे गुन्हे वाढतात का?

आजच ई-सकाळ मधल्या दोन बातम्या वाचल्या की 'खंडणी / अपहरण पुण्यातील गुन्हेगारीचा ट्रेंड' आणि 'मित्रानेच केले अपहरण व मागितली एक कोटीची खंडणी'


त्यात परप्रांतीयांचा प्रमुख सहभाग आहे असे म्हटले आहे. माझे तर मत असेच आहे की निश्चितच परप्रांतीयांमुळे गुन्ह्यात वाढ झालेली आहे (खास करून बिहार, दिल्ली, राजस्थान येथून आलेली मंडळी)


पुण्यात झालेले विधी महाविद्यालयातील रॅगिंग, शहरात-वस्तीवर पडणारे दरोडे, अपहरण, खून-मारामाऱ्या यात त्याच लोकांचा प्रामुख्याने सहभाग असतो असे आढळून येते.


शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने शहरात येणारे हे परप्रांतीय (दुसऱ्या बातमीतला आरोपी (झारखंड) क्रिकेटमध्ये भवितव्य घडविण्यासाठी आला होता) शहराचे एकूणच स्वास्थ्य बिघडवताहेत असं वाटतंय. पण यावर उपाय काय?


तुम्हाला काय वाटतं??