दहीपोळी

  • शिळ्या पोळ्या
  • २ पोळ्यांना २ चमचे दही
  • कोणताही मसाला
  • मीठ
  • १ चमचा तेल
१५ मिनिटे

१.एका वाटीत दही घेउन त्यात उपलब्ध असलेला कोणतही मसाला घालावा.(कांदा-लसूण मसाला/गरम मसाला/पाव भाजी मसाला/लसूण चटणी सुध्दा चालेल.)मीठ घालून कालवून घ्यावे.

२.अर्धी पोळी घेउन,त्याच्या चतकोरावर हे दही चमच्याने नीट पसरून लावावे.उरलेला चतकोर त्यावर टाकावा. असे २-३ त्रिकोण तयार करुन तव्यावर ठेवावेत.दोन्ही बाजूंनी तेल सोडून मध्यम आंचेवर खमंग भाजून घ्यावे.

३.टोमॅटो सॉस/चिंचेच्या चटणी बरोबर खावे.

बरेचदा शिळ्या पोळीचे काय करावे ,असा प्रश्न पडतो.विशेषतः जेव्हा अगदी एक-दोन पोळ्याच उरलेल्या असतील, तेव्हा हा अगदी ५ मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे.वर १५ मिनिटे लिहिलं कारण त्यापेक्षा कमी पर्यायच उपलब्ध नव्हता.(पोळ्या जास्त जरी उरल्या तरी, फोपोसाठी ,मला त्यांचा चुरा करायचा फारच कंटाळा!)

माझी ही पहिलीच पाककृती /पहिलेच लेखन आहे.   सुधारणा,अधिक माहिती ,अभिप्राय,टीका यांचे स्वागत.                           

देवश्री

एका मैत्रीणीची आई