६वे युरोपियन मराठी संमेलन, नेदरलँड

प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो,


डच मराठी भाषिकांतर्फे तुम्हा सर्वांना ६व्या युरोपियन मराठी संमेलनाला आमंत्रिण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे संमेलन २८, २९ आणि ३० जुलै २००६ रोजी नेदरलँड मधील अल्मेलो शहरात आयोजित केले आहे. तुमच्या उपस्थितीत हे संमेलन भरघोस यशाने साजरे करण्याची इच्छा आहे.


ह्या संमेलनात आपणास पुढील प्रकारे सामील होता येईल :


१. संमेलनास उपस्थित राहून बोधक आणि मनोरंजक कार्यक्रमांचा आस्वाद + अंगच्या कलागुणांच्या प्रदर्शनाची संधी


२. संमेलनाच्या स्मरणिकेतून तुमच्या साहित्याला + जाहिरातींना वाचकांपर्यंत पोचवा.


तुमच्या सोयीसाठी संगणक जाळ्यात (इंटरनेट)  www.ems2006.nl ह्या जागी अधिक माहिती इंग्रजी भाषेत उपलब्ध केलेली आढळेल. कृपया वारंवार ह्या जागेस भेट द्यावी कारण ही माहिती आम्ही नियमितपणे अद्ययावत करीत आहोत.


महत्वाची गोष्ट अशी की फक्त ४०० रसिकांची व्यवस्था करण्याची सोय आहे. तरी इच्छुकांनी कृपया त्वरित नोंदणी करावी.


२८ जुलै २००६ रोजी संमेलनास आपल्या भेटीची अपेक्षा ठेवीत आहोत.


 


धन्यवाद,


समिती, ६वे युरोपियन मराठी संमेलन.