त्रिगुणात्मक त्रैमूर्ती

सुखकर्ता दुःखहर्ता वाचा आणि अर्थ सांगा.


लवथवती विक्राळा वाचा आणि अर्थ सांगा.


दुर्गे दुर्घटभारी वाचा आणि अर्थ सांगा.


त्यानंतर ही आरती -


त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥


जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव जय देव ॥धृ॥


सबाह्य अभ्यंकरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥


जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव जय देव ॥धृ॥


दत्त येऊनिया उभा ठाकला
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥


जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव जय देव ॥धृ॥


दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥


जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता
आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव जय देव ॥धृ॥


ह्या आरतीचा अर्थ कोणी नीट समजावून सांगेल का? त्रिगुण कोणते? त्रिगुणी अवतार म्हणजे काय? नेति नेति शब्द अनुमाना येत नाही म्हणजे काय? समाधी न ये ध्याना? अभ्यंकरी की अभ्यंतरी? मात? पराही? अंत पुरलासे? उन्मन?


- सोपा