बाजार

बाजार मांडला मी अवघ्या तनामनाचा
घ्या अंगांग निरखून, मग सावकाश बोलू


आलें विकावयास श्रृंगारस्वप्नं सारी
तुम्हीच मोल लावा, कशी साद मी घालू


येऊन कैक गेले करण्या वधूपरीक्षा
सांगा क्षुधित नजरा अजुनी किती मी झेलू


अगतिक होऊनिया एका रुकारासाठी
कितीदा अशी स्वत:ला या तागडीत तोलू


प्रतीक्षेत बहरण्याच्या करपून वेल गेली
राही कलेवराचा पण देहधर्म चालू