गजल (तुझ्या फुलांचा...)


तुझ्या फुलांचा इथे कसा हा गंध दाटतो
येउन इतका दूर कसा हा मला गाठतो...


समजावू मी अता कुणाला 'शांत राहणे'
क्रोधाग्नी हा प्रत्येकाच्या मनी धुमसतो...


पावलांत या ताकद नव्हती पुढे चालण्या
हृदयी वारा भरून मी हा पुढे चालतो...


"आयुष्याची माती केली", लोक म्हणाले
शांतपणे मी पुन्हा नव्याने कविता रचतो...


आवरू कसा आयुष्याचा अता पसारा
पसाऱ्यात या 'अजब' 'मला' अन 'तुला' शोधतो...