स्टिम राईस

  • १ वाटी तांदुळ
  • ४ वाटी पाणी
१५ मिनिटे

हा भाताचा प्रकार मी नुकताच शिकलो.

कुकर किंवा microwave पेक्षा ह्या प्रकाराने भात चांगला व पटकन होतो.

- तांदूळ धुऊन घ्या.
- एका भांड्यात, जमलेच तर कुकर मध्ये पाणी उकळायला ठेवा, भांड्यावर झाकण ठेवा म्हणजे पाणी लवकर उकळेल.
- पाणी चांगले उकळले की त्यात तांदूळ टाका, व परत झाकण ठेवा
- साधारण ५ मिनिटे चांगल्या मोठ्या गॅस वर तांदूळ उकळू द्या
- तांदूळ शिजले असे वाटले की लगेच गॅस बंद करा व एका चाळनीतुन तो भात निथळून घ्या, म्हणजे त्यातले सर्व पाणी काढून टाका.
- चाळनीतच त्याला ५ मिनीत झाकून ठेवा

झाला एकदम मस्त मोकळा भात तयार.

नाहीत.

मधे गावी गेलो होतो तेव्हा १०० लोकांचा भात कसा करतात ते पाहीले, गावात ह्याला टोपलीतला भात म्हनतात.