जोडण्यात गेली..
सारी हयात त्याची, ही 'तोडण्यात' गेली!
माझी वृथाच होती; जी 'जोडण्यात' गेली!
साधाच मायना तो, जमला कधीच नाही,
सारीच शाई माझी, तो खोडण्यात गेली!
रंकास 'भारी' होती, माझीच खेळणी का,
पूंजी अखेर सरता, जी 'मोडण्यात' गेली?
आजन्म पित होतो, मी दु:ख ह्या जगाचे,
-व्यसने कधीच माझी, ना 'सोडण्यात' गेली!
अपुलेच रक्त झाले, अपुलेच हाडवैरी,
अपुलीच माणसे का , ही 'फोडण्यात' गेली?
-मानस६