आम्ही लिखाळ लिखाळ

आम्ही खट्याळ खट्याळ
गूढरम्यतेला चाट,
जीवनाच्या खोलीवर
आम्ही हास्याची रे लाट.


आम्ही घायाळ घायाळ
कधी काळजाला हात,
भावभरल्या काव्याला
असे आसवांची साथ.


आम्ही खोड्याळ खोड्याळ
आम्हा गमतीची साथ,
गंभीर त्या कवितेला
विडंबनानेच मात.


आम्ही लिखाळ लिखाळ
जूनी आमुची जमात,
तुम्ही डुलक्याना काढा
आम्ही आमुचेच भाट.


तुम्ही पानांवर चुना
आम्ही चुन्यावर कात,
आम्ही ओढाळ लिखाळ
आम्ही बाष्कळ लिखाळ


तुम्ही कमळ कमळ
आम्ही त्यांतील भ्रमर,
आमुच्यारे अस्तित्वाला
तुम्ही सुगंधी कोंदण.


---लिखाळ.