अभिनंदन मनोगत !

मनोगताला वर्ष पूर्ण होत असतानाच मिळत असलेल्या भरपूर प्रतिसादाने २००५ गाजवले. ह्या वर्षाची सुरुवातही मनोगताने दणदणीतच केल्याचे जाणवते ते आजच्या म.टा. तल्या मुंबई टाईम्स मधील, मराठी वेब ह्या सदराखालील तुमचा आमचा कट्टा ! ह्या लेखामुळे.
मनोगताच्या वाटचालीचा एक छोटा पण परिणामकारक धावता वेध ह्या बातमीने घेतल्याबद्दल महेश वेलणकर, प्रशासक व मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन.
मनोगताचा हा वेल वटवृक्ष होऊन मराठी मनांचा खराखुरा आरसा असेल ह्यांत तीळमात्र शंका नाही.
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!